Dr. Bansode's || Shree Vishwanand ||

गर्भ धारणा : एक नैसर्गिक क्रिया

Picture of Vaidya Nilam Bansode

Vaidya Nilam Bansode

Ayurved

ज्या प्रमाणे मल-मूत्र विसर्जन ही प्राकृत क्रिया आहे , भुकेची जाणीव , निद्रेचा वेग या प्राकृत क्रिया आहेत ,
त्याच प्रमाणे ” गर्भ धारणा ” ही देखील नैसर्गिक क्रिया आहे.
त्याला कृत्रिमतेची जोड देण्याआधी थोडं थाम्बा आणि विचार करा.

” शुक्र शोणित जीव संयोगे तू खलू कुक्षिगते गर्भ संज्ञा | ”
( चरक संहिता – शारीर स्थान अध्याय 4 श्लोक 5 )

असं जेंव्हा आचार्यांनी लिहुन ठेवलं आहे , त्यांना नक्कीच दूर दृष्टी असणार. त्यामुळेच गर्भ काय हे सांगतांना ” कुक्षिगते ” हा शब्द वापरला आहे.

शुक्र – पुरुष बीज
शोणित – स्त्री बीज
जीव – चेतना
या तीनही गोष्टींचा संयोग स्त्री च्या कुशीत – गर्भशयात होतो त्याला गर्भ असे संबोधले आहे.
हा बीज संयोग होत असतांना त्यामध्ये मनासोबत जीवाचा प्रवेश होतो तेंव्हा गर्भ तयार होतो.

म्हणुनच , गर्भ रहात नसेल , तर वर्षभरात हताश होऊन कृत्रीम साधनांकडे वळण्यापुर्वी नैसर्गिक प्रक्रीयेला चालना देण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा.

नेमका प्रॉब्लेम कुठे आहे हे जाणुन घ्यावे.
बीज तयार होत नाही ?
की नीट फुटत नाही ?
बीज नलिका बन्द आहे ?
की गर्भशयाचे अस्तर चांगले नाही ?

एक ना अनेक !
शिवाय मानसिक स्थिती देखील गर्भ धरणे मध्ये महत्वाचे काम करते.
यातील नेमके कारण जाणुन त्यावर आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म उपचार केल्यास तेथील दोष दूर होऊन नैसर्गिक गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक आहे.
याद्वारे फक्त conception या एका क्षणाचा नव्हे , तर स्त्री च्या शरीराचा , भविष्यातील संभाव्य व्याधींचा आणि कुशीत येणार्या बालकाच्या शारीर व मानस आरोग्याचा असा broad spectrum विचार केला जातो.

प्रत्येकाच्या अडचणी नुसार औषधी व पंचकर्म चिकित्सा बदलते.
तरिही सामान्यतः स्त्री व पुरुष दोघांनी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शरीर शुध्ही साठी बस्ती करुन घ्यावेत. त्यायोगे बीज चांगले तयार होते.
नस्य : स्त्रियांसाठी गर्भशयाला बल देण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.
मानसिक स्थिती सुदृढ नसल्यास वैद्यांचे मार्गदर्शन व सोबत सिध्ह तेलाची शिरोधारा काम करुन जाते.

म्हणुनच , थोडं थांबावं , विचार करावा .
निसर्गला थोडा वेळ द्यावा.
नैसर्गिक चिकित्सेला थोडा वेळ द्यावा.
#Ayurveda
#Awareness post
#Natural conception

#Dr_Nilam_Bansode
Ayurveda Consultant
Panchakarma Visharad
Garbhasanskar tadnya
Diploma in Yog Ayurved
M.A. Sanskrit
Pune.

Subscribe to our Newsletter

Subscribe to our newsletter and get lot of useful information related to Ayurveda

Share this post with your friends

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *