Dr. Bansode's || Shree Vishwanand ||

व्याधीक्षमत्व आयुर्वेदिक उपचार – हेच करेल कोरोनावर मात

Picture of Vaidya Nilam Bansode

Vaidya Nilam Bansode

Indian spice turmeric Golden milk in a mug on a dark stone table
#खरंतर , social media वर खूप काही messages आपण वाचत आहोत. त्यापैकी काही खरं काही खोटं…
पण , त्यापेक्षा वेगळं , आयुर्वेदिक विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
म्हणून personal hygine , sneezing वगैरे सगळं माहित आहे असं गृहित धरुन वेगळे मुद्दे मांडते.
#आयुर्वेद शास्त्रात चिकित्सा तर सांगितलीच आहे , पण सोबत एक छान महत्वाचा भाग सांगितला आहे .
” व्याधीक्षमत्व “
म्हणजे रोगला दूर ठेवण्याची प्रतिकार क्षमता चांगली असणे. आणि हेच सध्या महत्वाचे आहे.
अनेक वर्षांपासून समाज साथीच्या रोगांना समोर जात आहे. देवी आणि प्लेग सारख्या साथीत पण उंदरांसारखी माणसे पटापट मरत असे वर्णन पहायला मिळते. अगदी अलिकडे sars आणि swine flue ने देखील मोठ्या प्रमाणात हल्ला केला होता. यथावकाश त्यावर औषधे व लस निर्माण झाली व व्याधीक्षमत्व वाढवले.
म्हणुनच , आज corona सोबत समाना करायचा असल्यास , काही विशिष्ट आयुर्वेदिक औषधे घेण्यास व लहान मुलांना देण्यास हरकत नाही. त्यामूळे श्वसन संस्था व संपूर्ण शरीराची ताकत चांगली ठेवली जाणार आहे.

#आयुष_मंत्रालय द्वारा वैद्यांना
Prophylactic majors म्हणून
अगस्ती हरितकी अवलेह
त्रिकटू
संशमनी वटी
यांचा उपयोग करण्यास सांगितले आहे.
1) मुलांना दूध प्यायला देतांना चांगले उकळून त्यामध्ये सुन्ठ व हळद घालून प्यायला द्यावे.
Curcumin म्हणजे हळद हे पुर्वापार anticeptic म्हणून काम करते हे माहितच आहे.
2) शतावरी कल्प नित्य दूधतून घेतल्याने सर्व शरीराचे स्वास्थ्य टिकून राहते.
3) व्योषादी किंवा एलादी नावाच्या गोळ्या वैद्यांकडे मिळतात.
त्या दिवसातून 3 वेळाचघळण्यासाठी वापराव्या. त्यामूळे घश्याची खाज , आग कमी होते.
4) श्वसन मार्गावर काम करणारी काही औषधे जसे अडूळसा , यष्टीमधू इ. यांचे योग घेतल्याने फायदा होतो.
उदा: सितोपलादी चूर्ण रोज मधातून चाटण करावे.
5) सुवर्ण प्राशन संस्कार हा पुष्य नक्षत्रावर केला जातो. त्यामध्ये असणारे सुवर्ण , ब्राह्मी अशी औषधे बुध्ही सोबतच मुलांची रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात. म्हणून ,सद्य:परिस्थितीत हे औषध रोज देणे चांगले ठरेल.
6) च्यवनप्राश हे उत्तम रसायन व व्याधी क्षमता वाढवणारे औषध आहे. घरातील प्रत्येकाने घेणे योग्य.
याप्रकारे ,वैद्यांकडे अनेक योग रोग प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी उपलब्ध असतात. ते योग्य वैद्य सल्ल्याने खावेत.
अश्याप्रकारे , personal hygine सोबत आयुर्वेदाची मदत घेऊन व्याधी क्षमत्व वाढवावे.
या व्याधींचे वर्णन ” जनपदोध्वंस ” असे आहे ज्यामध्ये एक साथ मोठ्या संख्येत लोक आजारी पडतात.
म्हणुनच , स्वत:ची immunity वाढवण्याकडे भर द्या.
#StayHealthywithAyurveda
#वैद्य सौ. निलम बनसोडे
आयुर्वेदाचार्य
पंचकर्म विशारद
योग आयुर्वेद पदविका
गर्भसंस्कार तज्ञ
संस्कृत M.A.
पुणे.

Subscribe to our Newsletter

Subscribe to our newsletter and get lot of useful information related to Ayurveda

Share this post with your friends

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *