Dr. Bansode's || Shree Vishwanand ||

डॉ. जोशी : ( वरुण ) आपके swimmers जब इनके universe मे जाते हैं तो स्लो हो जाते है |

Picture of Vaidya Nilam Bansode

Vaidya Nilam Bansode

Shree2

काय म्हणतात डॉ जोशी ?????
अरे , आत्ताच्या Good News movie मधला scene आहे हा…!!!
ज्यामध्ये डॉक्टर सांगत असतात , sperms जेंव्हा female partener च्या vagina or uterus मध्ये जातात , तेंव्हा त्यांची गती कमी होते.
( किंवा ते जिवंत राहू शकत नाहीत )
असे का ?
याचे उत्तर आपण आयुर्वेद शास्त्रानुसार पाहुया.

स्त्रियांचे बीज म्हणजे आर्तव स्वभावत: ” ऊष्ण ” असते. त्यासोबत संपूर्ण शरीरातील उष्णता म्हणजे पित्त अधिक वाढल्यास योनी भाग व गर्भाशय या ठिकाणी उष्णता जास्त वाढते. प्रत्यक्ष परीक्षण केल्यावर सुध्हा तेथे , गर्भशयाचे बाहेरचे तोंड म्हणजे cervix च्या ठिकाणी erosions उष्णतेचे फोड आलेले दिसून येतात.

आणि पुरूषांचे शुक्र किंवा वीर्य ( sperm – semen ) हे स्वभावत: शीत – थंड गुणाचे असते.
असे हे शुक्र जर अति उष्णता असणार्या योनीभागात पडले ( संबंधा नंतर ) तर त्या उष्णतेने त्यांची गती कमी होते किंवा ते जिवंत राहू शकत नाहीत.
आणि त्यामूळे स्त्री बीज व पुरुष बीजाचा संयोग होऊ शकत नाही व गर्भ रहात नाही.
सगळं नॉर्मल आहे , मग गर्भ का रहात नाही , बाळ का होत नाही , याचं एक कारण स्त्री शरीरात व योनिभागी वाढलेली उष्णता हे पण असू शकते.

मग यावर उपाय काय ?

आयुर्वेद शास्त्रानुसार फार सुन्दर औषधी योजना करता येते.

1) स्त्रियांची सार्वदेहिक उष्णता का वाढली आहे हे व प्रकृती पाहून सूतशेखर वटी , प्रवाळ पंचामृत वटी , कामदूधा वटी , यासारख्या पित्त कमी करणार्या औषधी गोळ्या खूप उपयोगी ठरतात.

2) योनीभागी खाज , आग , दाह , जळजळ असे लक्षण असल्यास त्रिफळा काढा किंवा औदुंबर सालीचा काढा किंवा पंचवल्कल काढा याने धावन करावे. म्हणजे खालची जागा धुवावी. त्यामूळे स्थानिक थंडावा निर्माण होतो.

3) पुरूषांचे शुक्र कमी ताकतीचे असेल किंवा शुक्राणू ची संख्या कमी असेल तर शिवलिंगी , कपिकछू , अश्वगंधा , शिलजीत यासारख्या औषधींचा वापर करुन शुक्राची ताकत वाढवता येते.

4) स्त्रियांना योनिभागी उष्णता कमी करण्यासाठी
” योनी पिचू ” जास्त उपयोगी ठरतो.
योनी पिचू म्हणजे यासाठी खास तयार केलेल्या औषधी तेलात भिजवलेला कापसाचा बोळा योनीत आत सरकवून ठेवणे.
जसे जखम झाल्यावर क्रिम लावल्याने ती भरुन येते , तसे योनी पिचू ठेवल्याने cervix चे erosions कमी होतात.

ही सर्व treatment अनुभवी ज्ञानी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावी. कोणतेही औषध स्वत:च्या मनाने वा संगोपांगी घेऊ नये. वैद्यांच्या देखरेखीत निशं:क मनाने उपचार घ्यावेत.

मग , swimmers हे universe मध्ये गेल्यावर दम तोडनार नाहीत 😊

#वैद्यसौनिलमअनिलबनसोडे
– आयुर्वेदाचार्य
– पंचकर्म विशारद
– योग आयुर्वेद पदविका
– गर्भसंस्कार तज्ञ
– पुणे .

Subscribe to our Newsletter

Subscribe to our newsletter and get lot of useful information related to Ayurveda

Share this post with your friends

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *