विषय आयुर्वेदच , पण आज जरा वेगळं विवेचन .
” पंचकर्म ” आयुर्वेदाची इतकी महत्वाची treatment आहे . आणि असं ऐकल , काही जण घरी जाऊन एनिमा देतात आणि म्हणतात
” बस्ती “.
कोणी घरी जाऊन मालिश करतात आणि नाव
” आयुर्वेदीक massage treatment ” …….?????
हे उलटीच औषध ” पित्त ” बाहेर काढेल…..
या औषधाने ” जुलाब ” होऊन बरं वाटेल ……
● सुजाण नागरिकांनी याला बळी पडाव का ?
आयुर्वेदाच शिक्षण घेऊन , सगळे संस्कृत ग्रंथ नजरेखली घालुन , वैद्य जेंव्हा डिग्री घेतात , तेंव्हा शरीरातील रचना (anotomy) , क्रिया (physiology) , सोबत रोग निदान (pathology) आणि चिकित्सा (medicine) यांचे पुर्णत: ज्ञान त्यांनी मिळवलले असते.
त्याची सर , या इतर व्यक्तींना आहे का , हे आपण पडताळतो का ?

या एक दिवसाचे बस्ती , दोन दिवसाचे शिरोधरा आणि तीन दिवसाची मालिश करनार्यान्ना याचे सखोल ज्ञान असेल का ?
आणि मग , कोणाला काही अपाय झाल्यास नावं आयुर्वेदाला ठेवली जातात ना ?
लक्षात घ्या , पी हळद हो गोरी , हा नियम रोगाला लागू पडत नाही. जेवढा हळुहळू एखादा रोग त्याची मुळ पसरुन शरीरात वाढलेला असतो , तेवढाच वेळ तो काढून टाकायला ही द्यायला हवा. औषधाचा असो किंवा पंचकर्माचा , course हा ठरलेला असतो. त्यामध्ये कोणत्याही कारणाने फेरफार करणे , रुग्णाच्या फायद्याचे असणार नाही.
म्हणुनच , रोग कोणताही असो , आयुर्वेद शास्त्र मदत करणारच आहे. पण डिग्री व अनुभव असणार्या वैद्याचे मार्गदर्शन घेणे हे आपले काम आहे.
एवढी दक्षता घेणे तर प्रत्येकाला जमू शकते.
प्रत्येक ” Herbal ” म्हणजे आयुर्वेदीक नाही.
कोणत्याही गोष्टीत 4 वनस्पती टाकल्या की ते आयुर्वेदीक बनत नाही. आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान असणार्या वैद्याला त्या वनस्पतींचे गुण व प्रमाण पूर्णत: ज्ञात असतात.
आयुर्वेद व वैद्य हे समीकरण योग्य आहे. इतर कोठेही आयुर्वेदीक शब्द पाहुन भुलण्यापेक्षा पदवी असणार्या वैद्या कडून शाहनिशा करुन घेणे रुग्णाच्या फायद्याचे आहे.
@वैद्य सौ निलम बनसोडे
आयुर्वेदाचार्य , पंचकर्म विशारद .
श्री विश्वानंद आयुर्वेदिक चिकित्सलय
मगरपटटा हडपसर.